हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिम्मित सावद्यात शिवसेनेचा अनोखा कार्यक्रम

पालिका रोजंदारी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा सत्कार

सावदा, प्रतिनिधी | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त सावदा येथे आयोजित कार्यक्रमात नगर पालिका पाणीपुरवठा कर्मचारी यांचा शिवसेनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला.

सावदा येथील विश्राम गृह येथील प्रांगणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. रविवार, दि.२३ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता शिवसेना शहर प्रमुख भरत नेहते यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी तालुका उपप्रमुख धनंजय चौधरी, शामकांत पाटील, मिलींद पाटील, शरद भारंबे, प्रमोद भंगाळे, अतुल नेहते यांच्या उपस्थित होते.

दरम्यान शहरात पाणीपुरवठा करणारी ‘मांगलवाडी’ येथील तापी पात्रातून आलेली पाईपलाईन रेल्वेच्या लहान पुलाखाली फुटली. दुरुस्तीस कठीण जागा असूनही लवकरात लवकर शहरास पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करत शहरवासियांची तहान भागवली त्याबद्दल त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रोजंदारी कर्मचारी सचिन बोडे, विकास भंगाळे, धनंजय पाटील, सुरेश चौधरी, अशोक कुऱ्हाडे आणि प्रल्हाद कुऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला.

शहर प्रमुख भरत नेहेते, तालुका उपप्रमुख धनंजय चौधरी, मिलिंद पाटील, संघटक शरद भारंबे, माजी नगरसेवक शामकांत पाटील, युवा सेना प्रमुख मनीष भंगाळे, नितीन महाजन, सुनील राणे, दूध डेअरी संचालक प्रमोद भंगाळे, अतुल नेहते, गणेश माळी, चंद्रकांत पाटील, शब्बीर खा अय्युब खां, हुसेन खा अय्युब खा आदींची यावेळी उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!