निमखेडी शिवारात पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील निमखेडी शिवारात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ८५ लाख रूपयांच्या विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन रविवारी २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्व. बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, जिल्हा नियोजन समिती सदस्य शाम कोगटा, नगरसेवक मनोज चौधरी, डॉ. चंदशेखर पाटील, प्रतिभा पाटील आणि लताताई भोईट यांच्यासह ज्येष्ठ नागरिक प्रकाश पाटील, सुधीर पाटील, टी.पी. चौधरी, भारतीताई पाटील, रेखाताई चौधरी, श्रीमती जाधव ताई, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आणि कॉलनीवासियांतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी शहरात सध्या विकासकामांना वेग सुरू आला असून यात प्रामुख्याने रस्त्यांसह महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे नमूद केले. जळगावकरांना सर्व सुविधा देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे नमूद करत नगरसेवक मनोज चौधरी यांच्या सामाजिक कामांचे आणि धडाडीचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नगरसेवक मनोज चौधरी यांनी केले.

Protected Content