Home आरोग्य चाळीसगाव तालुक्यात आज २५ संक्रमित रूग्ण आढळले!

चाळीसगाव तालुक्यात आज २५ संक्रमित रूग्ण आढळले!

0
33

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र आज अचानक चाळीसगावात २५ संक्रमित रूग्ण आढल्याने संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

चाळीसगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत चढ उतार सुरू आहेत. मात्र गत तीन दिवसांपासून रूग्णांची संख्या हि ३० वरच पहायला मिळत आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालानुसार चाळीसगावात आज २५ बाधीत रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आढळून येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत पहिल्यांदा घट झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरासह तालुक्यात दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound