डॉ. बी.एस. पाटील राष्ट्रवादीत : उपाध्यक्षपदी नियुक्ती !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपचे मोठे नेते तथा माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला असून त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकेकाळी सलग तीन पंच वार्षिक अमळनेरचे प्रतिनिधित्व करणारे,दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फळीतले दिगग्ज भाजपाचे माजी आमदार डॉ बी एस पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत आज जळगावात अधिकृत पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्यावर लागलीच राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देखील सुपुर्द करण्यात आली आहे.

डॉ. बी.एस. पाटील हे कधीकाळी अमळनेर तालुक्याच्या राजकारणातील सर्वेसर्वा होते. २००९ सालच्या निवडणुकीत त्यांचे तिकिट कापून अनिल भाईदास पाटील यांना पक्षाने पुढे केल्यानंतर ते मागे पडले. त्यांनी गेल्या चौदा वर्षात अनेकदा पुनर्वसनाचा प्रयत्न केला. यानंतर आता त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत केलेला प्रवेश हा लक्षणीय मानला जात आहे. ते अनिल पाटलांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरू शकतात.

दरम्यान माजी आ.डॉ बी,एस पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली असून.यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात.कोणाला फायद्याची व कोणाची डोकेदुखी ठरणार हे नक्कीच पाहणे महत्वाचे असणार आहे.

Protected Content