पुण्यातील माजी आमदार मेधा कुळकर्णीं यांच्यावर हल्ला

पुणे वृत्तसंस्था । भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. शनिवारी सायंकाळी मारहाण झाली असून चौघा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमर बनसोडे आणि विनोद गेंदेला अटक करण्यात आली, तर तेजस कांबळे आणि मिथुन हरगुडे फरार आहेत.

पुण्यात कोथरुड परिसरातील सहजानंद सोसायटीजवळ हा प्रकार घडला. दारु पिण्यास बसलेल्या युवकांनी जाब विचारल्याच्या रागातून कुलकर्णींसह तिघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. दारुड्यांनी सुरुवातीला सहजानंद सोसायटीतील रहिवासी विलास कोल्हे आणि राहुल कोल्हे यांच्यावर हल्ला केला. विलास कोल्हे कुत्र्याला घेऊन बाहेर गेले होते. त्यावेळी दारुड्यांनी आमच्यावर कुत्रा का सोडता, असं विचारत मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार मेधा कुलकर्णी घटनास्थळी आल्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यात कुलकर्णी यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. मुख्य आरोपीसह दोघे जण फरार आहेत तर दोघांना अटक केली आहे. कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणारे फरार आहेत. या प्रकरणी कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेधा कुलकर्णी कोण आहेत?
मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होते. २०१४ मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध ६४ हजार मतांनी विजय मिळविला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले होते.

Protected Content