मोटारसायकलसह चोर पोलिसांच्या ताब्यात

 

जळगाव प्रतिनिधी । मोटारसायकलची चोरी करुन ती फिरविणार्‍या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडुन चोरीची मोटारसायकलही जप्त करण्यात आली.

शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना मोठ्याप्रमात घडत आहे. या घटना उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी कर्मचार्‍यांना सुचना दिल्या आहे. जामनेरमधून चोरीस झालेली मोटारसायकल शेख मुस्तकिन शेख सलीम (रा. घरकुल बिल्डींग) हा फिरवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. अशोक महाजन, सुरज पाटील, युनूस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव यांनी याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने जामनेरातील मच्छीबाजारातून मोटारसायकल लंपास केल्याची कबुली दिली असून चोरी केलेली मोटारसायकल देखील त्याने पोलीसांना काढून दिली. तसेच ही मोटारसायकल मी स्वत:च फिरवित असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी शेख मुस्तकीन याला जामनेर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

 

 

Protected Content