घर खाली करण्याच्या कारणावरून घरमालक व भाडेकरू यांची पोलीस ठाण्यात हाणामारी

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरातील भारत नगरात घर मालकाने घर खाली करण्याच्या कारणावरून शहर पोलीस ठाण्याच्या घरमालक व भाडेकरू यांच्यात एकमेकांमध्ये झोंबाझोंबी होवून हाणामारी झाल्याची घटना आज दुपारी १२.४० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून चार जणांवर भादवि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, सुरेश रायसिंग कांबळे (वय-५०) आणि ज्ञानेश्वर रायसिंग कांबळे (वय-४८) दोन्ही रा. भारत नगर जळगाव हे शिवाजी नगर परिसरातील भारत नगरात भाड्याच्या घरात राहतात. घरमालक विशाल युवराज सोनवणे (वय-३८) रा. मटन मार्केट बेंडळे चौक जळगाव व त्याचा भाऊ विकास युवराज सोनवणे (वय-४०) रा. भारत नगर जळगाव यांनी सुरेश कांबळे व ज्ञानेश्वर कांबळे यांना घर खाली करण्याचे आज रविवारी १८ जुलै रोजी सकाळी सांगितले. याचा राग आल्याने सुरेश कांबळे व ज्ञानेश्वर कांबळे यांनी घरमालक विशाल सोनवणे व त्याचा भाऊ विकास सोनवणे यांच्यात वाद झाला. यात विशाल व विकास यांनी सुरेश कांबळे व ज्ञानेश्वर कांबळे यांना मारहाण केल्याचे सांगितले. याची तक्रार देण्यासाठी कांबळे बंधू शहर पोलीस ठाण्यात दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आले. त्यावेळी सोनवणे बंधू देखील हजर होते. पोलीसांनी थोडावेळ बाहेर थांबण्याचे सांगितले. घर मालक सोनवणे आणि भाडेकरू कांबळे बाहेर थांबले. १० मिनीटानंतर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात चौघांमध्ये पुन्हा झोंबाझोंबी करून मारामारी करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोहेकॉ राजेंद्र परदेशी, पो.ना. संतोष खवले, महिला पोलीस कर्मचारी सुजाता राणे, पो.कॉ. उन्हाळे, भरत चव्हाण, मनोज पाटील आणि भुषण पाटील यांनी तत्काळ सोडवासोडव केली. पोलीस कॉन्स्टेबल भुषण पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात हाणामारी केल्याप्रकरणी चौघांवर भादवि कलम १६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Protected Content