गाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार : ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी : कोणत्याही गावातील रस्त्यांप्रमाणेच शिवारात जाणारे रस्तेदेखील महत्वाचे असतात, कारण यावरून शेतकरी ये-जा करतात. आता यापुढे आपण गाव तिथे शिवरस्ता ही मोहिम राबवणार असून याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगाव तालुक्यातील विदगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे होते.

तालुक्यातील विदगाव येथे आज शिवसेनेचा मेळावा आयोजीत करण्यात आला. यात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रत्येक गावातील रस्याबाबत लोकप्रतिनिधी जागरूक असतात. रस्ते व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. मात्र शेतकरी ज्या रस्त्यावरून शेतकरी नेहमी ये-जा करतात त्या रस्त्यांबाबत कुणी जागरूक नसते. याचीच दखल घेत गाव तिथे शिवरस्ता ही योजना अंमलात आणली जाणार आहे. असे प्रतिपादन देखील पालकमंत्र्यांनी केले.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पदे येतात आणि जातात, मात्र जनसेवा ही कायम राहिले पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने जनहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

दरम्यान, राजकारणात शब्द पाळण्याला खूप महत्व असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. ते म्हणाले की, कार्यकर्ता हीच खरी पूजा आहे. ज्यांच्याकडे काम करणारे कार्यकर्ते तोच खरा श्रीमंत नेता आहे. मात्र पदे येतील अथवा जातील. तथापि, जनसेवा कायम राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंचायत समिती सभापती ललिताताई पाटील यांनी सांगितले की महिला संघटन मजबूत करण्याचा निश्चय केला असून पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तर जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिव संपर्क अभियान प्रभावीपणे राबवून गाव तिथे शाखा व शिवसैनिक नोंदणीवर भर देण्याचे आवाहन केले.

तसेच ठाकरे सरकारने लोकहिताच्या व शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवली व त्याचा लाभ जास्तीत जास्त जनतेला कसा घेता येईल याची माहिती दिली, या अभियानात पालक मंत्री यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व तात्काळ समस्या सोडवण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले.तसेच जळगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या मंजूर प्रकरणांचे पत्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

माजी सैनिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

शिव संपर्क अभियानाच्या निमित्ताने ममुराबाद – विदगाव परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला तसेच परिसरातील 18 सरपंच उपसरपंच यांनी या अभियानात सहभाग नोंदवला. शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. या अभियानांतर्गत संघटनात्मक बांधणी, पक्ष बांधणी, बुथरचना बुथप्रमुख, गटप्रमुख, सह-गटप्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या. पदाधिकार्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेतला व या संदर्भात चर्चा केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन वासुदेव सोनवणे यांनी तर आभार सामाजिक कार्यकर्ते जना आप्पा पाटील पाटील यांनी मानले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, सभापती ललिताताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी , महानगरप्रमुख शरद तायडे, डॉ.कमलाकर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पं.स. सदस्या शितलताई पाटील, सरपंच प्रतिभाताई कोळी, ह .भ. प. चैतन्य महाराज, रमेशआप्पा पाटील, मार्केटचे प्रशांत पाटील, अनिल मडोरे, प्रकाश पाटील, दिलीप जगताप, वासुदेव सोनवणे, ममुराबाद पंचक्रोशीतील शिवसेना युवासेना महिला गाडी चे पदाधिकारी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संचालक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content