Home Cities जळगाव जळगावात शिव संपर्क अभियानाच्या नियोजनासाठी अल्पसंख्याक आघाडीची बैठक (व्हिडीओ)

जळगावात शिव संपर्क अभियानाच्या नियोजनासाठी अल्पसंख्याक आघाडीची बैठक (व्हिडीओ)

0
101


जळगाव प्रतिनिधी । शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे शिव संपर्क अभियानाच्या नियोजनासाठी अल्पसंख्याक आघाडीची आज बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावेळी महानगर प्रमुख शरद तायडे, शिवसेनेचे जेष्ठ नेते नितीन लढ्ढा, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, अल्पसंख्यांक महानगरप्रमुख जाकिर पठाण यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी शिव संपर्क अभियानाची माहिती दिली व  शिवसंपर्क अभियानाचे राबविण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी जळगाव शहरातील प्रत्येक वार्डात शिवसेना कशी पोहचेल यासाठी शिवसैनिकांनी आता मैदानात उतरावे असेही शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले. याप्रसंगी उपमहानगरप्रमुख वसीम खान, इक्बाल शेख, रईस शेख, अल्पसंख्यांक शिवसैनिक विकी शेख, इक्बाल शेख, फिरोज शेख, अशपाक मिर्झा, जब्बार शेख, समीर खाटीक, अशपाक शाह, अशपाक बागवान यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

 


Protected Content

Play sound