कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ६८१ बाधित रूग्ण आढळले; ८११ रूण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात कालप्रमाणे आज देखील दिलासादायक रूग्ण संख्या दिसून आली. दिवसभरात जिल्ह्यात ६८१ बाधित रूग्ण आढळले तर ८११ रूग्ण कोरानामुक्त झाले आहेत. आज एकुण ९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हाभरातील आजची आकडेवारी 

जळगाव शहर-६०, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-८२, अमळनेर-२९, चोपडा-६८, पाचोरा-४, भडगाव-३, धरणगाव-२९, यावल-३२, एरंडोल-४४, जामनेर-१६, रावेर-४७, पारोळा-३५, चाळीसगाव-९२, मुक्ताईनगर-७२, बोदवड-३४ आणि इतर जिल्ह्यातील १८ असे एकुण ६८१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३३ हजार ८९३ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख २१ हजार ७८२ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत तर ९ हजार ७१६ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Protected Content