धरणगाव येथे मौर्य क्रांती संघाच्या राज्यस्तरीय परिवर्तन यात्रेचे स्वागत

धरणगाव प्रतिनिधी । राज्यभरात मौर्य क्रांती संघाची परिवर्तन यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. धरणगावात परिवर्तन यात्रेचे धनगर समाजा बांधावांनी जोरदार स्वागत केले.

याप्रसंगी धनगर समाज बांधव, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, छत्रपती क्रांती सेना आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

१७ आक्टोबरपासून महाराष्ट्र राज्यभरात मौर्य क्रांती संघाची परिवर्तन यात्रा सुरू आहे. मौर्य क्रांती संघाची परिवर्तन यात्रा धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजस्मारका जवळ आल्यानंतर  धनगर समाज बांधवांनी व बहुजन क्रांती मोर्चा,भारत मुक्ती मोर्चा,भारतीय युवा मोर्चा,छत्रपती क्रांती सेना, तर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मौर्य क्रांती संघाचे  महासचिव  प्रताप पाटील, महिला आघाडी मौर्य क्रांती संघाच्या अरुणा पाटील, पश्चिम महाराष्ट्र मौर्य क्रांती संघाचे सत्यवान दुधाळ, महिला आघाडी मौर्य क्रांती संघ कोमल दुधाळ, सुमित्र अहिरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.  मान्यवरांच्याहस्ते छ. शिवाजी महाराज स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन केले.

मौर्य क्रांती संघाचा माध्यमातून धनगर व बहुजन बांधवांना एका विचाराखाली आणण्याचे काम करत असून समाजाचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जे अधिकार मिळाले आहेत, ते अधिकार हिरावून घेण्याचे काम इथली मनुवादी व्यवस्था करीत आहे, समाजाला जागृत करून मनुवादी व्यवस्थेविरुद्ध लढा उभारण्याचे काम मौर्य क्रांती संघाचा माध्यमातून येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मौर्य क्रांती संघाचे सत्यवान दुधाळ यांनी केले.

यावेळी अरुणाताई कंखरे, नगरसेवक जितेंद्र धनगर, अमोल हरपे, अतुल सूर्यवंशी, सुनील चौधरी, छोटू भाऊ धनगर, ज्ञानसगर सूर्यवंशी, छत्रपती क्रांती सेनेचे लक्ष्मण पाटील, ओबीसी मोर्चाचे राज्य सदस्य राजेंद्र वाघ, भारतीय युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष निलेश पवार, भारत मुक्ती मोर्चाचे गौतम गजरे, भाजपाचे नगरसेवक शरद कंखरे आदी उपस्थित होते.

 

Protected Content