एसटी विलीनीकरण अहवाल फेटाळला, खाजगीकारणाकडे महामंडळाची वाटचाल (व्हिडीओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधिमंडळाच्या आर्थिक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु झाली असल्याचे स्पष्ट झाले असून कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

विधिमंडळाच्या आर्थिक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य असल्याचे जाहीर केले असल्यामुळे एसटी महामंडळाची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन तीन वर्षापासूनच शिवनेरी, शिवशाही, विठाईं अशा अनेक बसेस कंत्राटी तत्वावर सुरु करुन खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु केली होती. केवळ कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाच्या मागणीसाठी दिशाभूल केली असल्याचे उद्वेगजनक संताप कर्मचार्यांनी व्यक्त केला. हा अहवाल फेटाळला असला तरी आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही संपकरी कर्मचार्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात तसेच राज्यात गेल्या १३० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्याचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसंह संसर्ग वा अन्य कारणामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात यावी अशा अन्य मागण्यासाठी संप सुरु आहे. राज्य सरकारने विलीनीकरणासाठी त्रिसदस्यीय समिती नेमून त्याचा अहवाल कोर्टात सादर करण्यासाठी वेळोवेळी वेळ मागून संपकरी करणाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून आज विधिमंडळ आर्थिक बजेट प्रसंगी प्रथमच विलीनीकरण अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची खाजगीकरणाच्या दिशेंने वाटचाल सुरु झाली असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात संप सुरु झाल्यापासून ते आतापर्यत जळगाव विभागातील सुमारे ५००० कर्मचाऱ्यापैकी आतापर्यंत सुमारे १२०० ते १३०० कर्मचाऱ्यांना बडतर्फ, सेवासमाप्ती, निलंबन, कारणे दाखवा, प्रशासकीय बदली अशा कार्यवाही करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत

एकूणच त्रीसदस्यीय समितीचा विलीनीकरण अहवाल विधिमंडळात फेटाळला गेल्याने महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. एसटी महामंडळाचे ५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या तसेच संपात सहभागी नसलेल्या मोजक्याच कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशीबशी सुरु आहे. एकीकडे रेल्वेद्वारे अजूनही सर्वसाधारण तिकिटे वा मासिक पास सुरु करण्यात आलेले नाहीत, तर दुसरीकडे विलीनीकरणअ अहवाल फेटाळला गेला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे.

उद्यापासून परीक्षार्थींची खरी परीक्षा

विलीनीकरण अहवाल विधिमंडळात फेटाळला गेल्याने जिल्ह्यात एसटी बसेस सुरु होण्याची शक्यता जवळ जवळ मावळली आहे. उद्या शुक्रवार, दि.४ मार्च पासून बारावी तर मंगळवार दि.१५ मार्चपासून १० वी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे त्याच शाळेत असले तरी एसटी बसेस नसल्याने परीक्षेसाठी वेळेवर पोचण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/948950562429508

Protected Content