एचआयव्हीसह जीवन जगणारे बांधणार प्रेमाची रेशीमगाठ ! (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । जागतिक एड्स दिन मंगळवार १ डिसेंबर रोजी कानळदा येथे एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या मुला-मुलींचा विवाह सोहळा तसेच एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी विजय बुंदे उपस्थित होते.

मागील १२ वर्षापासून पुंडलिक सपकाळे एका सामाजिक उपक्रम एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या मुला-मुलींच्या विवाहाचे आयोजन करीत असून हे आयोजनाचे १३ वे वर्ष आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने मंगळवार १ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी ५.३० वाजता सामुहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. यात २ जोडप्यांचा विवाह होणार असून आतापर्यंत राज्यभरात एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या २१ जोडप्यांचा विवाह पुंडलिक सपकाळे यांनी लावून दिला आहे. २६/११/२००८ च्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली म्हणून देखील याचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करतांना विजय बुंदे यांनी सांगितले की, एचआयव्हीग्रस्त देखील सर्वसामन्यांपणे आपले जीवन जगू शकतो असा संदेश समाजात जावा यासाठी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे आयोजनात एन.एम.पी. प्लस, पुणे, आधार बहुउद्देशीय संस्था,जळगाव, नेटवर्क ऑफ नंदुरबार, जयभवानी मित्र मंडळ व कर्तव्य गृप कानळदा यांचा सक्रीय सहभाग आहे.

Protected Content