आजी नंतर नातू देखील संत गजानन चरणी होणार लीन ! : ४५ वर्षानंतर जुडून आला योगायोग

शेगाव-अमोल सराफ स्पेशल रिपोर्ट | कॉंग्रेस नेते राहूल गांधी हे संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेणार असून आपल्या आजीनंतर ते ४७ वर्षांनी श्रींच्या चरणी लीन होणार आहेत.

संत नगरी शेगाव मध्ये आज कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. या यात्रेमुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. अशातच संतनगरी शेगाव मध्ये आज राहुल गांधी पायदळ चालत पोहचले आहेत. ज्या संतभूमीमध्ये ते येत आहे त्याचे सुद्धा गांधी घराण्याची नाते जोडलेले आहे. कारण जेव्हा श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव म्हणजेच विदर्भ पंढरी संस्थांच्या वतीने काही वर्षांपूर्वी अगदी भारताच्या कानाकोपर्‍यापर्यंत म्हणजे अमरनाथ पर्यंतही पालखी जायची. आता केवळ पालखी आषाढी वारी घेऊन पंढरपूरला जाते.

ही पालखी जेव्हा एकदा दिल्लीला पोहोचली होती तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी पालखीला नेण्यात आले होते. त्यावेळी पालखीसोबत असणार्‍या वारकर्‍यांनी इंदिराजींच्या परसबागेत त्यांच्यासोबत फोटो काढला होता. विशेष म्हणजे या फोटोमध्ये सध्या शेगाव कॉंग्रेसचे नेते असणारे ज्ञानेश्वर दादा पाटील हे इंदिरा गांधी यांच्या समोरच उभे असून ते अगदी तेव्हा जवळपास आठ ते दहा वर्षाचे होते.

श्री संत गजानन महाराजांची पालखी १९७५ साली. बस द्वारा ८४ कोस परिक्रमा उत्तर प्रदेश या ठिकाणी गेली होती. परतीच्या प्रवासाची पालखी जेव्हा दिल्लीत पोहोचली आणि विदर्भातील ही पालखी दिल्लीत असल्याचे गांधींना कळले तेव्हा त्यांनी विशेष निमंत्रण पालखीला त्यांच्या घरी बोलावले होते. यावेळी इंदिराजींनी संस्थांची अन वारकर्‍यांची विचारपूस करून त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला होता.

विशेष म्हणजे या पालखीत पाटील परिवाराच्या अनेक सदस्य सहभागी झाले होते .हे सर्व या छायाचित्रातून दिसत आहे आज शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा एक वेगळा व वर्तमान इतिहास आला उजाळा देणार आहे. श्री गजानन महाराजांची पालखी इंदिरांचीनी चां दारी गेली होती. यानंतर आज ४७ वर्षांनी इंदिराजींचे नातू खासदार राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेतून श्री संत गजानन महाराज यांच्या दारी म्हणजे शेगावला आले आहेत. ४५ वर्षांनी घडून आलेला हा योगायोग विलक्षण मानावा लागणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content