मुस्लिम बांधवांवर होणारे अत्याचार थांबवण्याबाबत निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । संपूर्ण भारत देशात मुस्लिम बांधवांवर नेहमीच अत्याचार केले जात असल्याने या घटनांवर कायमस्वरूपी पायबंदी लावण्यात यावी, या मागणीसाठी पाचोरा बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (दि. ८) रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदुत्ववादी काही संघटनांनी तेथील मस्जिद व मदरसांमध्ये दुर्गा पंडाल मधील पाक कुरानाची अवहेलना करण्यात आली होती. त्याचे पडसाद त्रिपुरा राज्यात पडल्याने तेथील भाजपाचे प्रदेश अध्यक्ष राजीव भट्टाचार्य, पापिया दत्ता व टिंकु राय यांचे नैतृत्वाखाली तसेच विश्व हिंदू परिषद, हिंदू धर्म जागरण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्थानिक मुस्लिम बांधवांना भडकावुन भारतीय दंड संहिता १४४ लागु असतांना देखील विविध माध्यमातून दंगे व अत्याचार सुरू केला आहे. त्याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या दुकानाची तोडफोड व लुटमार करत त्यांचेवर प्राणघातक हल्ला चढवला आहे. या घटनेने त्रिपुरा सह आगरतला, धरमनगर मस्जिद, रतनवाडी मस्जिद, महारानी उद्यपुर मस्जिद, कृष्णा नगर मस्जिद व परिसरातील मुस्लिम बांधवांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदन देतेवेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष हमिद रशिद शहा, राष्ट्रीय ओ. बी. सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, राज्य उपाध्यक्ष विलास पाटील, प्रोटान जिल्हा उपाध्यक्ष मुबारकशहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजहर खान, राष्ट्रीय मुल निवासी पिछडी जाती जागृती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष दिपक आदिवाल, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, साजिद कुरेशी, बापु परदेशी, इमरान नसिर, मोची समाज संघटनेचे रमेश पवार, नगरसेवक अशोक मोरे, राष्ट्रीय क्रांती मोर्चा संयोजक नंदलाल आगारे सह बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध सामाजीक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Protected Content