भुसावळ शहरातील जनता संचारबंदीचे स्वागत करू या ; डॉ.नी.तू पाटील यांचे आवाहन

 

भुसावळ (प्रतिनिधी) आज भुसावळच्या इतिहासातील महत्त्व पूर्ण पान लिहले जाईल. आज रात्री 12 वाजता भुसावळकरांनी भुसावळकरांच्या हितासाठी भुसावळमार्फत राबविलेले हे “संपूर्ण भुसावळ शहर संचारबंदी” आहे. भुसावळकरांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली ही संचारबंदी आहे. मित्रहो…स्वयंमस्फूर्तीने केलेली संचारबंदी आहे, तेव्हा तिचे स्वागत करू या, अशा शब्दात डॉ.नीतू पाटील यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून भुसावळकरांना आवाहन केले आहे.

 

डॉ.नीतू पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट म्हटलेय की, मित्रहो…आपण वेळोवेळी सोशल मेडियामार्फत ,ट्विटर मार्फत, लोकप्रतिनिधी यांच्याशी प्रत्यक्ष अथवा फोन द्वारे, प्रशासन आदींशी याबाबत मागील कित्येक दिवसापासून मागणी करत होते. पण खरा मागणीचा जोर पकडला गेला. दि.27 एप्रिल पासून जेव्हा भुसावळ शहरात पहिला करोना रुग्ण सापडला. मग हळूहळू रुग्ण। संख्या वाढली आणि मागणीचा जोर वाढला, विशेषतः आपली पोस्ट दि.27 एप्रिल यावरील कंमेंट्स संख्या 93, तथा शेअर संख्या 55 एवढी होती, ह्यात भुसावळ आणि भुसावळ बाहेरील नागरिक सुद्धा होते, कालच जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना ई-मेल केलेत,शिवाय भुसावळ बद्दल कळकळ असणारी जनता, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आदी आदी सर्वांनी आपल्या आपल्या परीने मागणी करत होते, या सर्वांचे मी लाख लाख आभार व्यक्त करतो आणि पुढील काळात देखील अशीच साथ राहील अशी अपेक्षा बाळगतो…!

 

खरे आपण प्रांत ,तहसिल भुसावळ प्रशासन कार्यालयाच्या मागे “भुसावळ शहर संपूर्ण संचारबंदीची ” मागणी करत होतो, पण प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत नव्हते. तेव्हा या मग भुसावळ लोकप्रतिनिधी यांनी भेटून ही जनतेची मागणी आहे, जनता स्व:हुन तयार आहे, हा जनतेचा जनतातर्फे आहे. सरते शेवटी प्रशासनाला होकार द्यावा लागला आणि मग सर्व यंत्रणा कामाला लागली.

 

आज भुसावळच्या इतिहासातील महत्त्व पूर्ण पान लिहले जाईल. आज रात्री 12 वाजता भुसावळकरांनी भुसावळकरांच्या हितासाठी भुसावळमार्फत राबविलेले हे “संपूर्ण भुसावळ शहर संचारबंदी” आहे. भुसावळकरांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली ही संचारबंदी आहे. मित्रहो…स्वयंमस्फूर्तीने केलेली संचारबंदी आहे, तेव्हा तिचे स्वागत करू या. ‘मी,माझा परिवार, माझे शेजारी,माझा वॉर्ड,माझे भुसावळ शहर संपुर्ण पणे यात सहभागी राहील याची मी भुसावळकर म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत आहे आणि संचारबंदी पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल,असा प्रत्येकाने संकल्प करू या आणि भुसावळ शहरात जनता संचारबंदीचे स्वागत करू या…!

 

डॉ नितु पाटील,

भुसावळकर

Protected Content