जातीयवादी वडेट्टीवारांची हकालपट्टी करा : विनायक मेटे

मुंबई प्रतिनिधी | मदत व पुनर्वसन मंत्री विनायक मेटे हे जातीयवादी असून मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते आ. विनायक मेटे यांनी केली आहे.

विनायक मेटे हे मराठा आरक्षण प्रश्‍नी आक्रमक झाले असून आज त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. मदत आणि पुनर्वसन मंत्री व कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात. मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे, त्यामुळे तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केली आहे. 

विनायक मेटे पुढे म्हणाले की, आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर २३ तारखेपासून अहमदनगरपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. शिवस्मरकाचे काम अद्यापही सुरु झालेलं नाही. महाराजांच्या नावे राजकारण करणार्‍यांना स्मारकाचा विसर पडलाय. शिवस्मारकाचं कामही लवकरात लवकर सुरू व्हायला हवं, अशी मागणी मेटे यांनी केलीय.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या २ वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी २ मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

 

Protected Content