सध्याच्या घडीला गरिबांना मदत करणे आवश्यक ; राहुल गांधींसोबतच्या चर्चेत रघुराम राजन यांचे मत

मुंबई (वृत्तसंस्था) देशभरातील लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प तर कारखान्यांना टाळं लागलेले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत असून जीपीडीचा वेग पूर्णत: थांबला आहे. सध्याच्या घडीला गरिबांना मदत करणं आवश्यक आहे, ज्यासाठी सरकारला सुमारे ६५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांबाबत राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मांडले.

 

 

देशात कोरोना बळींची संख्या एक हजारांवर गेली आहे. कोरोना रोखण्यासाठीचा देशव्यापी लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपणार आहे. कोरोनामुळे होणाऱ्या अर्थसंकटाशी कशा प्रकारे सामना करावा याबाबत गांधी यांनी राजन यांच्याशी संवाद साधला. राजन म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था २०० लाख कोटींची आहे. त्यापैकी ६५००० कोटी हे गरिबांच्या अन्नपुरवठ्यासाठी वापरायला हवेत. कोरोनाने साऱ्या जगासमोर आव्हान उभे केले आहे. कोरोना रोखण्यासाठी नियमांपलिकडे जाऊन कामं करावे लागेल. तसेच रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांच्या एका प्रश्नावर उत्तर दिले की, देशातील गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी लागेल, ज्यासाठी ६५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. गरिबांना ६५ हजार कोटी रुपये देण्याची गरज असल्याचेही सांगितले. दरम्यान, डॉ. रघुराम राजन 2013 पासून 2016 पर्यंत रिझर्व बँकचे गव्हर्नर होते. अनेक वेळा त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकाही करताना दिसले.

Protected Content