चीनकडून भारताला अप्रत्यक्षपणे हायड्रोजन बॉम्बची धमकी

बीजिंग (वृत्तसंस्था) लडाखमध्ये २० भारतीय जवानांचे प्राण घेणाऱ्या चीनने उलट्या बोंबा सुरु केल्या आहेत. एवढेच नव्हे तर चीनने भारताला अप्रत्यक्षपणे हायड्रोजन बॉम्बची धमकी दिल्यामुळे तणावात अधिकची भर पडली आहे.

 

 

चीनने आजच्या दिवशी १९६७ मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. त्याचाच व्हिडिओ चीन सरकारचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने शेअर केला आहे. ग्लोबल टाइम्सने या ट्विटच्या माध्यमातून भारताला अप्रत्यक्ष हायड्रोजन बॉम्बचा इशारा दिला आहे. हायड्रोजन बॉम्ब हा आत्मसंरक्षणेसाठी असून आमचा देश पहिल्यांदा अणवस्त्रांचा वापर करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

Protected Content