माजी पररराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज कालवश

sushma swaraj नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुषमा स्वराज यांच्यावर २०१६ साली किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती. दरम्यान, काल सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र उपचार सुरू असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुषमा स्वराज यांनी मोदी सरकारचे अभिनंदन करणारे ट्विट केले. यानंतर काही तासांमध्येच त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आज पहिल्यांना सुषमा स्वराज यांचे पार्थिवर भाजप मुख्यालयात आणले जाईल. यानंतर दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, स्वराज यांच्या निधनाचे वृत्त येताच मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली असून अनेक नेत्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली आहे.

Protected Content