अंबिका दुध उत्पादक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

dush utpadak sanstha meeting

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली असून यात उत्पादकांना संस्थेच्या नफ्यातून बक्षीस, भाव फरक,बोनस, व लाभांश देण्यात आला

फैजपूर येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभेचे आयोजन संस्थेच्या सभागृहात संस्थेचे चेअरमन हेमराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी विषय पत्रिकेवर १५ विषय घेण्यात आले होते. या सर्व विषयांवर चर्चा होऊन या सभेत सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संस्थेचे कार्य चांगले असल्याने प्रगतीपथावर आहे या दूध उत्पादक संस्थेची सभासद संख्या ३५२ इतकी आहे दूध उत्पादकांकडून प्रति दिन २ हजार लिटर दुध पुरवठा होतो. तर संस्थेकडून सभासदांच्या गुरांना मोफत लसीकरण दिले जाते. दूध उत्पादक यांच्या कडून मिळणार्‍या सहकार्यामुळे या संस्थेकडून दूध उत्पादकांचे हित साधले जाते.

दरम्यान, या वार्षिक सर्वसाधारण सभेत ३१ लाख ६० हजार व्यापारी नफ्याच्या रकमेतून संस्था दूध उत्पादकांना बक्षिस, भावफरक, बोनस व लाभांश आदींसाठी २० लाख रुपये वितरित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चेअरमन हेमराज चौधरी, व्हा. चेअरमन नितीन राणे, जेष्ठ संचालक भास्कर चौधरी , समशेर तडवी , चंद्रशेखर चौधरी , कमलाकर भंगाळे ,डिंगबर कोल्हे , मोहन वायकोळे, रमेश झोपे, जितेंद्र भारंबे, अजय महाजन, लक्ष्मण झांबरे, उमाकांत भारंबे ,अप्पा भालचंद्र चौधरी,विनोद चौधरी , विजय पाटील , वंदना कमलाकर कोल्हे, ज्योत्स्ना मोतीराम भारंबे व सचिव सुनील क्षत्रिय यांची उपस्थिती होती.

Protected Content