अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली

arun jaitley

 

दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान,जेटलींना बघण्यासाठी देशातील दिग्गज नेत्यांची रुग्णालयात रीघ लागली आहे.

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने नऊ ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनीदेखील एम्समध्ये जाऊन जेटलींची भेट घेतली. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अश्विनी चौबे, ज्योतिरादित्य शिंदे, अरविंद केजरीवाल, मोहन भागवतदेखील एम्समध्ये गेले होते. अरुण जेटलींना एक्स्ट्रा कॉर्पोरेशनल मेंब्रेन ऑक्सिजिनेशन (ईसीएमओ) मध्ये ठेवण्यात आले आहे. ज्या रुग्णांची फुफ्फुस आणि हृदय काम करत नाही, त्यांना ईसीएमओमध्ये ठेवले जाते.

Protected Content