मुक्ताईनगरमध्ये श्रीराम पाटील यांची झंझावाती प्रचार फेरी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार फेरीला मुक्ताईनगरकरांचा जोरदार प्रतिसाद लाभला.

प्रचार रॅलींची सुरुवात प्रवर्तन चौकातील महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली. प्रवर्तन चौकातून नागेश्वर मंदिर, चाळीस मोहल्ला, अल्फा हायस्कुल, शिवराय नगर, अहिल्यादेवी नगर, संताजी नगर, मार्गे शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयाजवळ आल्यावर समारोप झाला.

या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, रावेर पं.स.माजी सदस्य दीपक पाटील, ईश्वर रहाणे, पवनराजे पाटील, संतोष पाटील, संतोष बोदडे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व मुक्ताईनगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारफेरीला कार्यकर्त्यांसह मतदारांनीही भरभरून प्रतिसाद दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार रक्षा खडसे यांनी तो सोडवण्यासाठी काहीही हालचाली न केल्याचे मतदारांनी सांगितले. त्यावेळी उमेदवार श्रीराम पाटील यांनी भावी काळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन मतदारांना दिले. याबाबत विशेषतः स्त्री मतदारांनी आनंद व्यक्त केला. मतदारांनी श्रीराम पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आश्वासन दिले.

Protected Content