पक्षसंघटन मजबुतीकरणासाठी यावल तालुका कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 25 at 2.26.24 PM

यावल, प्रतिनिधी | येथे आज रविवार २५ ऑगस्ट रोजी शेतकी सहकारी तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात येथे यावल कॉंग्रेस कमिटीची पक्षसंघटन आणि विविध विषयांना घेवुन महत्त्वपूर्ण बैठक तालुका कॉंग्रेस अध्यक्ष व गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

काँग्रेस कमेटीच्या प्रदेश संघटनच्या दिलेल्या आदेशानुसार पक्षाच्यावतीने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ध्वजवंदन करण्याचे सांगितल्याप्रमाणे झेंडा वंदन कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कदीर खान यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पक्षाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी अनुसूचित जाती विभाग बबन तायडे, जिल्हा सचिव व चंद्रकला इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग देवनाथ पाटील, यावल नगर परिषदचे गटनेते सय्यद युनूस सैय्यद युसुफ, मा. नगरसेवक गुलाम रसूल गुलाम दस्तगिर, नगरसेवक मनोहर सोनवणे, शेख जाकीर तालुका अध्यक्ष शेखर तायडे, पुंडलिक बारी, अनिल जंजाळे, रहमान खाटिक, इम्रान पहेलवान, राहुल बारी, नईम शेख, महिला तालुका अध्यक्ष पुष्पा झाल्टे, अभिषेक इंगळे, जालिंदर कोळी, निसार अय्यूबखान, शेख सक्लेन अशपाक शाह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन भगतसिंग पाटील यांनी तर आभार शेखर तायडे यांनी मानले.

Protected Content