इतर देशांमधून ऑक्सिजन आणण्यासाठी नौदलाच्या नौका रवाना

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता भारतीय नौदलानं  इतर देशांमधून समुद्रमार्गे ऑक्सिजन भारतात आणण्यासाठी सुरुवात केली आहे. या ऑक्सिजनचा मोठा हातभार भारतातील रुग्णालयांना  मिळण्याची शक्यता आहे

 

देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  भारतीय नौदलाने INS Kolkata, INS Talvar, INS Jalashwa आणि INS Airavat या युद्धनौका या मोहिमेत उतरवल्या आहेत. नौदलानं ऑपरेशन समुद्र सेतू २ सुरू केलं आहे. भारताच्या युद्धनौका इतर देशांमधून ऑक्सिजनचे कंटेनर आणि इतर वैद्यकीय उपकरणं भारतात आणतील”, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

 

या युद्धनौकांपैकी आयएनएस कोलकाता आणि आयएनएस तलवार बहारीनच्या मनामा बंदरात सध्या असून त्या लवकरच मुंबईत  ४० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचे कंटेनर्स आणणार आहेत. त्याच प्रकारे ऑक्सिजन आणण्यासाठीच आयएनएस जलाश्व बँकॉककडे तर आयएनएस ऐरावत सिंगापूरकडे रवाना झाल्या आहेत

 

 

गेल्या वर्षी भारतीय नौदलाने अशाच प्रकारे वंदे भारत मिशन म्हणून ऑपरेशन समुद्र सेतूला सुरुवात केली होती. त्या वेळी मालदीव, श्रीलंका आणि इराणमध्ये अडकलेल्या सुमारे ३ हजार ९९२ नागरिकांना पुन्हा भारतात सुखरूप आणलं होतं.

 

 

 

भारतीय नौदलाच ५७ सदस्यांचं वैद्यकीय पथक २९ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये पाठवण्यात आलं आहे. या पथकामध्ये  ४ तज्ज्ञ डॉक्टर, ७ नर्स, २६ पॅरामेडिक आणि २० सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. हे पथक पीएम केअर कोविड हॉस्पिटलमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. सुरुवातीला दोन महिन्यांसाठी हे पथक नियुक्त करण्यात आलं असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ देखील करता येणं शक्य होणार आहे.

Protected Content