पडळकरांची दखल घेण्याची गरज नाही- शरद पवार

सातारा । गोपीचंद पडळकर यांना त्या त्या वेळी लोकांनी उत्तर दिले असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे बोलतांना केले.

भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सातारा येथे बोलतांना त्यांनी याबाबत पहिल्यांदाच भाष्य केले. ते म्हणाले की, बारामती लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ते आमच्याविरोधात लढले तर त्यांच डिपॉझिट जप्त झालं. सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही. लोकांनी त्यांना ज्या त्या वेळी उत्तर देत बाजूला केलं आहे, आपण त्यांची दखल का घ्यायची ? असा सवाल शरद पवार यांनी याप्रसंगी केला. ते पुढे म्हणाले की, भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. मात्र भारत-चीन युध्द होण्यासारखी परिस्थिती नाही. तो रस्ता आपला आहे. चीनने रस्त्यावर अतिक्रमण केलं. तिथं फायरिंग न करण्याचा करार आहे. भारत-चीन युद्ध होईल असं वाटत नाही. त्यांनी खुरापत काढली. तिथला रस्ता आपण काढतोय तो आपल्या हद्दीत आहे. सियाचिन आपला भाग आहे. म्हणून तो रस्ता केला आहे. त्यांची लोक रस्त्यावर येतात म्हणून धर पकड सुरु असल्याचे शरद पवार म्हणाले.

Protected Content