आर्सेनिक अल्बम ३० औषधीचे शब्द फाऊंडेशनतर्फे शहर वाहतूक नियंत्रण शाखेत वितरण

जळगाव, प्रतिनिधी । येथील शब्द फाऊंडेशनतर्फे आज आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा सुचविलेले व कोरोना विरुध्द लढ्यात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधीचे जळगाव येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील सर्व पोलीस बांधवांना विनामूल्य वितरण करण्यात आले.

आर्सेनिक अल्बम ३० ही होमिओपॅथी औषधी शब्द फाऊंडेशनचे उपाध्यक्षा अॅड.अनुराधा वाणी यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हेड कॉन्स्टेबल मेघना जोशी यांना सोपविण्यात आले. या प्रसंगी वाहतूक शाखेचे पोलीस उप निरीक्षक दिलीप पाटील, शब्द फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. लक्ष्मण वाणी, सचिव अॅड.शहेबाज शेख, कोषाध्यक्ष अॅड. अरुण मोरे, राहुल भावसार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी कोरोनाच्या या लढाईत शब्द फाऊंडेशन एक योध्दा म्हणूनच कार्य करीत असल्याने संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत आभार व्यक्त केले.

Protected Content