बुलढाणा येथील ई-पॉज मशीनची मिरवणूक

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्यभरात शिधापत्रिका धारकांचा रेशन दुकानदाराविरुध्द मोठ्या प्रमाण रोष आणि असंतोष वाढत आहे. आज बुलढाण्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानाचे ई-पॉज मशिनची मिरवणूक काढून ई-पॉज तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

ई-पॉज मशिनमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे रेशन दुकानदारांसह ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटलेल्या नाहीत. राज्यातील लाभार्थ्याना सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्याचे वितरण करण्यात येते धान्य वितरण हे पारदर्शी ह्वावे या करिता शासनाने ई पॉस मशीनच्या सहाय्याने लाभार्थीचे अंगठे घेऊन धान्य वितरीत करण्यात येते. परंतु काही दिवसांपासून ई-पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे लाभार्थी व दुकानदार तुफान खडाजंगी पाहायला मिळत आहे. यामुळे त्रस्त होऊन बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील  ई पॉस मशीन घेऊन मोर्चा काढून आज शुक्रवारी तहसील कार्यालयाला जमा करण्यात आल्या.

स्वस्त धान्य दुकानदारानं देण्यात आलेले ई पॉस मशीन टू जी सपोर्टेड असल्याने आणि वेळोवेळी नादुरुस्त होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद विवाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारानी ३१ मार्च  पर्यंत या अडचणीवर उपाय शोधावा अन्यथा १ एप्रिल २०२२ पासून सर्व दुकानदार आपल्या ई-पॉस मशिना आप-आपल्या तह सील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करतील अशा आशयाचे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जिल्हाधिकारी यांना शासनाकडे  दिले होते. त्यानुसार आज बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ठिकाणी सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील ई-पॉस तहसील कार्यलयाला जमा केल्या आहेत. तत्पूर्वी या ई-पॉस मशीनची मिवरवणूक काढण्यात आली.

Protected Content