पाचोऱ्यात आ. नितेश राणे यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपाचे आमदार नितेष राणे यांनी तृतीयपंथी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने पाचोऱ्यात वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने १४ जुलै रोजी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना निषेधार्थ निवेदन देण्यात आले.

 

निवेदन देते प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे, जिल्हा उपाध्यक्षा संजीवनी रत्नपारखी, जिल्हा सदस्य कांताबाई कदम, वंचित बहुजन आघाडीचे मा. तालुका अध्यक्ष अनिल लोंढे, तालुका सचिव सुनिल कदम, समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, संतोष कदम, आशा ब्राम्हणे, लता सपकाळे, वैशाली सोनवणे, प्रियंका ब्राम्हणे, दिलीप बागुल, किरण निकम, शांताराम खैरनार उपस्थित होते.

 

भाजपाचे आ. नितेष राणे हे सातत्याने समाजात धर्म, जात, व लिंग, आधारित वक्तव्य करतात, समुह – समुह, जाती – जातीत द्वेष व तेढ निर्माण करतात. त्याचाच एक भाग म्हणून नितेष राणे यांनी तृतीयपंथींबद्दल अपमान जनक वक्तव्य हे विकृतीचा भाग नसुन प्रकृती झाली आहे. अशी प्रकृती समाजात लिंग, धर्म व जातीचे नावाने द्वेष व तेढ निर्माण करते. मा. सर्वोच्च न्यायालयाने अशी प्रकृती रोखण्यासाठी तात्काळ गुन्हे नोंदवा असे निर्देशित केले आहे.

 

भाजपा आ. नितेष राणे यांच्या बेताल व अपमान जनक वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच वंचित बहुजन महिला व युवा आघाडीच्या सदस्या शमीदा पाटील यांना पोलिसांनी दमदाटी व अपमान जनक वागणुक दिली त्याचे विरोधात आम्ही निषेध व्यक्त करतो. अशा आषयाचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे पाचोरा पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले सदरचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी स्विकारले.

Protected Content