यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटन अधिक मजबूत व बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यभरात २५ जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची नाशिक शहर जिल्हा प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी २१ एप्रिल रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली. पक्ष संघटन विस्तार व बळकटीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, आमदार जावळे यांच्या निवडीबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, यावल कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, सभापती उज्जैनसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे व सविता भालेराव, तसेच तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.



