Home Cities भडगाव गोंडगाव येथे ‘चारा साक्षरता अभियान’ व बियाणे वाटप उत्साहात !

गोंडगाव येथे ‘चारा साक्षरता अभियान’ व बियाणे वाटप उत्साहात !

0
1

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे पशुपालकांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘चारा साक्षरता अभियान’ व चारा बियाणे वाटप कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या आणि उत्साहात पार पडला. पशुधनाचे उत्तम आरोग्य राखणे आणि दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी दर्जेदार व पौष्टिक चाऱ्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील ७० पेक्षा अधिक पशुपालकांना उच्च दर्जाच्या चारा बियाण्याचे वाटप करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला गोंडगावचे सरपंच राहुल पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच भडगाव पशुसंवर्धन विभागाचे संदीप निकम व कजगाव पशुसंवर्धन विभागातील इतर कर्मचारी आणि ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित तज्ज्ञांनी पशुपालकांना हिरव्या व पौष्टिक चाऱ्याचे महत्त्व सांगून योग्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी आणि पशुपालकांनी या संपूर्ण उपक्रमाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तळागाळातील आणि शेवटच्या घटकापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामपंचायत गोंडगाव येथे सरपंचांच्या हस्ते संबंधित प्रतिनिधींचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, यामुळे शेतकरी आणि पशुपालकांच्या सेवेसाठी अविरत काम करण्याची नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आणि सहकार्याबद्दल सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.


Protected Content

Play sound