Home Cities रावेर रावेरमध्ये मानवतेचा सुंदर आदर्श; अज्ञात व्यक्तीचा सन्मानपूर्वक अंत्यविधी

रावेरमध्ये मानवतेचा सुंदर आदर्श; अज्ञात व्यक्तीचा सन्मानपूर्वक अंत्यविधी


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जीवनशैलीतही मानवतेची जिवंत उदाहरणे अधूनमधून समोर येतात. असेच एक प्रेरणादायी उदाहरण रावेर येथे पाहायला मिळाले.

रावेर ग्रामीण रुग्णालयात एक अज्ञात मृतदेह तब्बल तीन दिवसांपासून पडून होता. ओळख पटत नसल्यामुळे त्या व्यक्तीचा अंत्यविधी कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. या संवेदनशील परिस्थितीत रुग्णालयातील डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत समाजसेवक रवी भाऊ पाटील यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच रवी भाऊ पाटील यांनी कोणतीही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ मदतीला धाव घेतली. रात्री उशिरा सुमारे १० वाजता त्यांनी सर्व धार्मिक विधी पार पाडत त्या अज्ञात व्यक्तीचा सन्मानपूर्वक अंत्यविधी केला.

या वेळी पोलीस कर्मचारी किशोर सपकाळे, विकास संन्या, सागर चौधरी, राहुल परदेशी, गोलू महाजन, चेतन पाटील, योगेश महाजन, सुनील भाऊ आणि सुनील कोळी उपस्थित होते.

ओळख नसलेल्या व्यक्तीला देखील सन्मानाने अंतिम निरोप देणे, हीच खरी मानवता आहे. रवी भाऊ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले हे निस्वार्थी कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Protected Content

Play sound