…तर रेशन दुकानांना पोलीस संरक्षण देण्यात येईल : छगन भुजबळ

नाशिक (वृत्तसंस्था) काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर सरकारने कारवाई केली आहे. मात्र रेशन दुकानदारांना मारहान करणे चुकीचे आहे. मारहाणीच्या घटना थांबल्या नाही तर रेशन दुकानांना पोलीस संरक्षण देण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

 

आज छगन भुजबळ यांनी नाशिकमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्यातील साडेबारा कोटी लोकांपैकी साडेसात कोटी लोकांना साडेतीन लाख टन अन्न धान्य पोहोचवले आहे. केंद्राचा मोफत तांदूळ 95 टक्के लोकांना दिला आहे. केसरी कार्डधारकांना 3 कोटी लोकांना कमी दरात तांदूळ गहू वाटप सुरू केले. म्ही अशा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांवर आम्ही कारवाई करत आहोत. मात्र काही ठिकाणी दुकानदारांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. राज्यात रेशन दुकानदारांविरोधात 19 एप्रिलपर्यंत 39 गुन्हे दाखल झालेत. अनेक दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. राज्यात 14 हजार तक्रारी आल्या असून 8 ते 9 हजार तक्रारी निकाली काढल्याची माहिती देखील श्री.भुजबळ यांनी दिली.

Protected Content