नाशिकच्या भीमवाडी झोपटपट्टीला भीषण आग ; २५ ते ३० झोपड्या जळून खाक

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकच्या भीमवाडी झोपटपट्टीला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. यावेळी एकामागोमाग एक तब्बल सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. यामुळे या आगीत २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, अवघ्या दहा मिनिटातच आगीचे आणि धुराचे लोळ पसरल्याने येथील लोक प्रचंड भयभीत झाले होते.

 

नाशिकच्या गंजमाळ येथील भीमवाडीत आज सकाळी साडे नऊच्या सुमारास ही लागली. भीमवाडी झोपडपट्टीत पत्रे आणि लाकडांची घरे असल्याने आगीने भराभर पेट घेतला. त्यातच काही घरांमधील सहा ते सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. अचानक लागलेल्या या आगीमुळे भीमावाडी झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी जीवमुठीत घेऊन तात्काळ घराबाहेर धाव घेतली. आगीने अधिकच रौद्ररुप धारण केल्याने २० ते २५ झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

Protected Content