आसोदा येथे ना. गुलाबराव पाटील यांना प्रचार रॅलीत वारकऱ्यांचा मिळाला आशीर्वाद

Gulabbhau patil

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मभूमीत असोदा येथे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. असोदा, घार्डी, किनोद, धानोरा, कठोरा व परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली.

रॅलीत अनेकांशी संवाद साधला गेला असता प्रचार रॅलीला थांबवून एका वारकरी बाबाने गुलाबराव पाटील यांना आशीर्वाद देताना सांगितले की, गुलाब भाऊ, तुम्ही केलेल्या विकासकामांमुळे व गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सदैव पाठीशी राहिलात म्हणून तुम्हाला कवित्री बहिणाबाई व तमाम वारकऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहेत. त्यामुळे तुम्ही प्रचंड मतांनी विजयी होणार असे सांगताच गुलाबराव पाटील हे भावूक झाले होते.

असोदा येथे ठिकठिकाणी महिलांनी केले औक्षण
सकाळी 7.30 वा.मारुती मंदिरात महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. भोळे नगर, हौसा नगर, हंडोरे नगर, भिलवाडी, कुंभारवाडा, कन्याशाळा परिसर, इंदिरानगर, वाल्मिक नगर, पंचशील नगर, काळेवाडा परिसर, डागरवडा, गणपती मंदिर परिसर, धोडी विहीर परिसर, माळीवाडा व टिल्लू मोहल्ला या भागात घरा- घरात जाऊन प्रचार करण्यात आला धनुष्यबाण निशाणी बाबत जनजागृतीही करण्यात आली. यावेळी आसोदा येथे सुमारे 150 ते 200 महिलांनी गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले. भगव झेंडे,कट आउट विविध घोषणांनी वातावरण भगवामय झाले होते, सुमारे चार तास प्रचार रॅलीला लागले.

नशिराबाद येथे जाहीर सभेचे आयोजन
महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ नशिराबाद येथे 16 ऑक्टोबर 2019 रोजी बुधवारी सायंकाळी 7.00 वाजता “साती बाजार चौक” येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मुंबईचे जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत,राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे मार्गदर्शन करणार आहेत.

16 तारखेचा प्रचार दौरा.
तरसोद सकाळी 7.00 वा., कंडारी 8:30 वा., उमाळे, 9:30 वा. देव्हारी 10:30 वा. धानवड 11 वा., धानवड तांडा 1.00 वा., चिंचोली 3.00 वा. कुसूंबा / रायपूर 4:30 वा.

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे कार्य अविस्मरणीय ! – आसोदेकर
आसोदा येथे प्रचार रॅलीत मान्यवरांशी संवाद साधला असता “गुलाबभाऊंनी आसोदा – भादली परिसरातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात सामान्य जनतेसाठी अनुदान पर्यंतच्या अनुदानसाठी विविध विकास कामे केल्यामुळे त्यांचे विकास कार्य हे अविस्मरणीय आहे. विकासकामांमुळे व त्यांचा जनतेशी असलेला दांडगा संपर्कामुळे गुलाबभाऊंना लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वास मार्केट कमिटीचे माजी सभापती संतोष नारखेडे, जि.प. सदस्य लालचंद पाटील, तुषार महाजन, मिलिंद चौधरी, ज्येष्ठ नागरिक संघाचे डी.यु. भोळे आणि एस.के.कोळी यांनी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी यावेळी कृउबाचे माजी सभापती संतोष नारखेडे, जि.प.सदस्य लालचंद पाटील, पवन सोनवणे, शिवराय पाटील, कैलास चौधरी, नाना सोनवणे, पं.स. सदस्य मिलिंद चौधरी, तुषार महाजन, जनाअप्पा कोळी, ज्येष्ठ नागरिक संघाचे डी.यु. भोळेसर, बालाशेठ, प्रमोद सोनावणे,राजेंद्र चव्हाण,रावसाहेब पाटील, संजय घुगे,मुकेश सोनवणे यांच्यासह भोजू महाजन,किशोर चौधरी, बापू महाजन, किरण महाजन, सचिन चौधरी, एस. के.कोळी,गोलू कोळी, डॉक्टर रमाकांत कदम, संजय बाविस्कर, ज्ञानेश्‍वर चौधरी, पिंटू कोळी, महेंद्र नारखेडे, अशोक भोळे, सरपंच संजय बिराडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी विविध गावांचे सरपंच, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content