म्युकरमायकोसिसशी लढण्यासाठी पण मोदी टाळ्या थाळ्या वाजवण्याचे सांगतील-राहुल गांधी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला मोदी सरकारचं कुशासन जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आता या आजाराशी लढण्यासाठी ते टाळ्या थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.  ते म्हणतात, मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळे फक्त भारतामध्येच कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगसची नवी महामारी उद्याला आली आहे. लसींचा तुटवडा तर आहेच, पण या नव्या आजारावरच्या औषधांचाही तुटवडा आता निर्माण झाला आहे. याविरोधात लढण्यासाठी आता पंतप्रधान टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची घोषणा करतीलच .

 

 

कोरोना परिस्थितीवरून विरोधक सतत मोदी सरकारवर टीका करत आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. देशातील लसीकरण सुद्धा ठप्प झाले आहे. विरोधकांनी मोदींनी विदेशात लशी पाठवल्यामुळे लशीची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले आहे. भारतात  मृत्यूची संख्या कमी होत नाही. दुसरीकडे, देशातील बऱ्याच राज्यांत लशीच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

 

राहुल गांधी म्हणाले होते, “देशात लसीकरण कमी होत आहे आणि कोरोनामुळे मृत्यू वाढत आहेत. लक्ष भटकवणे, खोट्या गोष्टी पसरवणे आणि तथ्य लपवणे हीच केंद्र सरकारची निती आहे.”

Protected Content