धरणगाव पालिकेचा १५५ कोटींचा अर्थसंकल्प सादर

 

धरणगाव, प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १५५ कोटी ३६ लक्ष ९६ हजार १४६ रूपये खर्चाचा अर्थसंकल्प गुरुवारी ५ मार्च रोजी झालेल्या सभेत सादर करण्यात आला. त्यास सभेने मंजूरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष निलेश चौधरी हे होते.

मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या अर्थसंकल्प सादर केला. सदर अर्थसंकल्पातील भाग १ मध्ये महसुली उत्पन्न रूपये १४४,६२,८,७३० एवढे अपेक्षित आहे. यात हद्दीतील प्रॉ. टॅक्स कर व इतर कर, नगरपरिषद मालमत्ता पासूनचे उत्पन्न तसेच शासनाकडून मिळणारे महसुली अनुदान याचा समावेश असून त्यातून दैनंदिन खर्च भागविण्यात येणार आहे.

अशा आहे तरतुदी

महसूली उत्पन्नातून अनुसूचीत जाती जमातीसाठी ६ लक्ष रूपयांची तरतुद, ५ टक्के विकलांगासाठी ६ लक्ष, प्रदुषण नियंत्रण बोर्ड ६ लक्ष, वृक्ष लागवडीसाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी रूपये १.७० लक्ष पाणी पुरवठा विभागासाठी रू. १०३.९० लक्ष ची तरतुद आहे. अर्थसंकल्पातील भाग २ मध्ये शासनाकडून मिळणारे भांडवली अनुदान १४० कोटी ११ लक्ष एवढे अपेक्षित असून सदर अनुदानातून गावातील विकास कामांवर भरीव खर्च करण्यात येतो. नविन रस्त्यांसाठी ४ कोटीची तरतुद असून नविन गटारीसाठी १० लक्ष, दलितेतर कामासाठी ४ कोटी, स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी १.५ कोटी, घरकुल योजनेसाठी ४० लक्ष तरतुद असेल. नगरपरिषदेचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा १५५ कोटी ३६ लक्ष ९६ हजार १४६ रूपयेचा अर्थ संकल्प तयार करण्यात आला असून यातून खर्च वजा जाता रक्कम रूपये ६३,७,६३७ एवढी शिल्लक दर्शविण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पासाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल निवृत्ती दिघोळे, प्रविण देशपांडे, अशोक चव्हाण आदिंनी परिश्रम घेतले. वैशिष्टपूर्ण योजनेसाठी ५ कोटी, विशेष वैशिष्टपूर्ण योजनेसाठी ३ कोटी, १४ वा  वित्त आयोगातील कामासाठी ५ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सुवर्ट जयंती महाअभियान (राज्यस्तर) यासाठी ११३ कोटी प्रस्तावित आहे. यातुन भुयारी गटार व नविन वितरण पाईप लाईन व रस्त्यांसाठी तरतुद करण्यात आली आहे. विशेष वैशिष्ट पूर्ण अनुदानातुन ३कोटी आले आहे. वाचनालयाचे जागेवर शॉपिंग सेंटर व हॉल बांधण्यात येईल.

Protected Content