‘लंपी’वर उपाय योजना करा : आ. शिरीष चौधरींनी उपस्थित केला मुद्दा

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार शिरीषदादा चौधरी यांनी लंपी स्किन डिसीज या रोगांवर तात्काळ उपाय योजना करण्याचे संबंधीत मंत्र्यांना निर्देश दिले असून आज याबाबत बैठक बोलेवली आहे.

सध्या सर्वत्र गुरांवरील लंपी या संसर्गजन्य आजाराने पशुपालक धास्तावले आहेत. खासकरुन खान्देश परिसराच्या ग्रामीण भागात गुरांवर लंपी स्किन डिसीस हा आजार खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक शेतकरी बांधवांचे गुरे दगावत आहे हा रोग भयंकर प्रमाणात वाढतं असून शेतकरी व दुध उत्पादका मध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे.

या अनुषंगाने आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विधानसभेच्या तालीका अध्यक्ष या पदावरून संबंधीतांना निर्देश दिलेत. शासनाने या रोगावर तात्काळ रोग प्रतिबंधक लस व औषधी उपलब्ध करावी अश्या सूचना संमधीत मंत्री महोदय यांना सभागृहात तालिका अध्यक्ष स्थानावरून आ. शिरीष चौधरींनी तात्काळ उपाययोजना करण्यात यावी या साठी सूचना केल्या होत्या. यावर आज पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्र्यांनी तात्काळ या रोगाचा संदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

 

Protected Content