रावेर नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड

रावेर प्रतिनिधी । आज झालेल्या विशेष सभेत येथील नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.

आजच्या सभेत नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी उपाध्यक्ष शेख नुसरत यास्मिन कलीम यांची पदसिद्ध सभापती म्हणून, बांधकाम समितीच्या सभापतीपदी संगीता अग्रवाल, स्वछता आरोग्य समितीच्या सभापतीपदी अ‍ॅड. सुरज चौधरी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीवर असिफ मोहम्मद दारा मोहम्मद आणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ललिता बर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या या सभेच्या पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या. नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, मुख्याधिकारी रवींद्र लांडे उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्स झालेल्या या सभेला २० सदस्य उपस्थित होते.

विषय समित्यांचे सभापती व सद्स्य असे

* नियोजन विकास समीती — शेख नुसरत यास्मिन कलीम (सभापती), सदस्य- हमीदाबी अय्यूबखां पठाण, पार्वताबाई गणपत शिंदे, राजेंद्र रामदास महाजन, जगदीश नथ्थू घेटे

* सार्वजनिक बांधकाम समीती — सौ.संगीता सूर्यकांत अग्रवाल(सभापती), सदस्य –सुधीर गोपाल पाटील, शेख सादीक अब्दुल नबी , खाँ असदुल्लाखां महेबूबखाँ , संगीता भास्कर महाजन,

* स्वच्छता आरोग्य व दवाखाना समिती –अ‍ॅड. सुरज प्रकाश चौधरी (सभापती), सदस्य–रंजना योगेश गजरे, प्रकाश श्रीराम अग्रवाल , राजेंद्र रामदास महाजन , यशवंत वासुदेव दलाल ,

* पाणी पुरवठा व जलनिःसारण समीती — आसीफ मोहंमद दारामोहंमद (सभापती) सदस्य — खाँ असदुल्लाखाँ महेबूबखां, संगीता शिरीष वाणी , सुधीर गोपाल पाटील, प्रल्हाद रामदास महाजन

* महिला बालकल्याण समीती — ललीता मल्हारी बर्वे (सभापती),सदस्य– रंजना योगेश गजरे, संगीता शिरीष वाणी, शारदाबाई देविदास चौधरी , पार्वताबाई गणपत शिंदे

Protected Content