मोठी बातमी : अशोक चव्हाण यांचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. त्यांनी स्वत: या चर्चांवर कोणतेही उत्तर दिले नव्हते. किंबहुना आपण कॉंग्रेस सोबत एकनिष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर त्यांनी आज कॉंग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते आता नॉट रिचेबल झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक असणारे कॉंग्रेसचे काही आमदार हे देखील प्रवेश करणार असल्याचे समजते.

Protected Content