ट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक; दोन जण गंभीर जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळील पुलावर सोमवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ट्रक आणि कंटेनर यांची समोरासमोर झालेल्या भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. वाहनांचे पत्रा कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. यातील एकाला जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा जवळील पुलावर जळगावकडून येणारा ट्रक क्रमांक (एमएच ४० वाय १३०८) व एरंडोलकडून येणारा कंटेनर (एमएच ४० सीटी ४०३५) यांच्यात समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता दुपारी घडली आहे.

या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरिकांनी कॅबिनचा पत्रा तोडून बाहेर काढण्यात आले होते. एरंडोल कडून येतांना डाव्याबाजूला रस्त्याचे काम सुरु होते. त्यामुळे उजव्या बाजूने येणारे व जाणारे दोन्ही कडचे वाहने जात असतांना दोन्ही गाड्या एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला होता. दरम्यान अपघात झाल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी अपघातस्थळी धाव यातील ट्रक चालक अरविंद माधव प्रसाद वय ३९ रा. भोपाल, मध्यप्रदेश याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर दुसर जखमी असलेला अज्ञात चालकाला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. अपघात घडल्यानंतर राजू गंगाराम पाटील, सोनू पाटील, मोतीलाल पाटील, सुखराम पाटील, योगेश नाना वाढले, युवराज पाटील या ग्रामस्थांनी धाव घेवून मदत केली.

Protected Content