बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या चौघे ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या चार जणांवर एमआयडीसी पोलीसांनी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारू व गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली आहे. चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार २ जून रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच हद्दीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावंर विशेष मोहिम राबविण्यात आली. पोलीसांनी राबविलेल्या मोहिमेत संशयित आरोपी अशोक तुकाराम कोळी रा. रामेश्वर कॉलनी जळगाव, करण दारासिंग बागडे रा. सुप्रीम कॉलनी जळगाव, दत्तू पुना पाटील रा. म्हाडा कॉलनी आणि अमोल प्रमोद पाटील रा. खेडी ता.जि.जळगाव हे चौघे वेगवेगळ्या भागात अवैधरित्या देशी दारू आणि गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. या कारवाईत २ हजार ४६० रूपयांची देशी दारू आणि १ हजार ५०० रूपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.न.गणेश शिरसाळे, पोना ईम्रानअली सैय्यद, पोना हेमंत कळसकर, योगेश बारी, मुदस्सर काझी, महिला पोलीस नाईक निलोफर सैय्यद, पोकॉ चंद्रकांत पाटील, गोविंदा पाटील, मुकेश पाटील, साईनाथ मुंढे यांनी धडक कारवाई केली आहे.

Protected Content