Home क्रीडा जळगाव पोलीस स्केटिंग क्लबची राष्ट्रीय स्पर्धेत चमक

जळगाव पोलीस स्केटिंग क्लबची राष्ट्रीय स्पर्धेत चमक

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ४७ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. या यशामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा उपक्रमांना नवी ओळख मिळाली असून खेळाडूंसह प्रशिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, मानव संसाधन विभाग यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्कृष्ट वेग, कौशल्य आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर यश मिळवले. ४ ते ६ वर्षे वयोगटात विराज मनोज सावळे याने १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. तसेच रिले स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. याच वयोगटातील आरोही दर्शन गोसावी हिने १०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून जिल्ह्याचा मान उंचावला.

६ ते ८ वर्षे वयोगटात रसिका नंदकिशोर पवार हिने १०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. रिले स्पर्धेतही तिने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले. ८ ते १० वर्षे वयोगटातील राजवीर नंदकिशोर पवार याने १०० मीटरमध्ये सुवर्णपदक आणि रिले स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले. याच वयोगटातील देविक विनोद साळुंखे हिने १०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले. रिले स्पर्धेत तिने एक रौप्य आणि एक कांस्यपदकाची कमाई केली. मिष्टी निलेश भोळे हिने १०० मीटरमध्ये रौप्यपदक तर रिले स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आपली छाप पाडली.

१० ते १२ वर्षे वयोगटातील लावण्या निलेश भोळे हिने १०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. तर ११ ते १४ वर्षे वयोगटातील तन्मय धिरज सोनवणे याने १०० मीटर स्पर्धेत कांस्यपदक मिळवले असून रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.


Protected Content

Play sound