
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिक तसेच शूर पोलीस व जवानांना जळगाव येथील भिलपुरा भागात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकात सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनच्या वतीने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरुवात दहशतवाद आणि पाकिस्तानचा तीव्र निषेध नोंदवून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी हातात पेटत्या मेणबत्या घेऊन दोन मिनिटे शांत आणि स्तब्ध उभे राहून २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या निर्दोष नागरिकांसह भारत मातेच्या वीर पोलीस अधिकारी व जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले.
या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, राहुल चौधरी, हाजी शकूर बादशाह, हाजी अकबर अली, हाजी शेख सलीमउद्दीन, हाजी अब्दुल रहीम, नितीन शिंपी, योगेश मराठे, शफी शेख, रवींद्र खैरनार, यासिन कुरेशी, अब्दुल रहेमान, युसूफ नागोरी, अझीझ इब्राहिम, मोहसीन कुरेशी आणि मुकेश सेठीया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच शेख रमजान, फैझान रहेमान, मोहम्मद नईम, परिमल मुझुमदार, मोईन कुरेशी, जावेद बागवान, अयान अलीम, झिशान हुसैन, अशफाक खान, जावेद अय्युब, अब्दुल्लाह बशीर आणि वसीम अहेमद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या श्रद्धांजली सोहळ्यात सहभागी झाले होते.



