मन एकाग्रतेसाठी बाल शिबिर संपन्न

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील विपश्यना साधना समिती आणि खडसे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, खडसे महाविद्यालयात जिमखाना विभागामध्ये ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांसाठी बाल शिबीर दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी आठ ते एक या दरम्यान नुकतेच आयोजित केले.

सदर शिबिरामुळे मनाच्या एकाग्रतेत निर्णय क्षमतेत निरीक्षण क्षमतेत लाभ होतो अश्या प्रकारच्या शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या. मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शाळा तसेच बोदवड व वरणगाव भागातील वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा असे आहवान करण्यात आले.

Protected Content