स्वाभिमानी शेतकरी संघटना’ ‘शेतकऱ्यांना विविध प्रश्नांविषयी जागृत करणार’ : रविकांत तुपकर

मुक्ताईनगर प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना विविध प्रश्नांविषयी विषयी जागृत करण्याचं काम आता स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले.

“संपूर्ण राज्यभरात राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करत आहे. सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी असून जळगाव जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढवणार असल्याचे” मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.

खांदेशामध्ये केळी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून त्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांची खूप मोठी लूट होत असल्याचे माझ्या निदर्शनामध्ये आलेले आहे असे सागत, “आता या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा पिंजून काढू. गावागावांमध्ये बैठका घेऊन जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ” असा विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम आता स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान पत्रकार दिनानिमित्त मुक्ताईनगर तालुका पत्रकार बांधवांना भव्य सत्कार सोहळा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे ,बुलडाणा जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, उत्तम जुमळे, सचिन पाटील, सुरेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content