संकट वाढले : जिल्ह्यात आज नव्याने ८८ कोरोना रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण सातत्याने वाढत आहे. आज दिवसभरात एकुण ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरासह चोपडा आणि भुसावळ तालुक्यात रूग्ण संख्येत वाढ  झाल्याचे दिसून येत आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज शुक्रवार ७ जानेवारी रोजी दिवसभरात एकुण ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर -३१, भुसावळ तालुका-२४, चोपडा-२७, यावल-२, रावेर-१, चाळीसगाव -३ असे एकुण ८८ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात २२३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. आज दिवसभरात एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ४० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजच्या अहवालात जळगाव शहरासह चोपडा आणि अमळनेर तालुक्यातील रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अहवालात दिसून आले आहे.

 

Protected Content