नागरिकांनी अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर तात्काळ भरती व्हावे (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । नागरिकांनी अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर तात्काळ भरती होवून उपचार करून घ्यावेत व कोरोना संसर्ग रोखण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर भरती सोनवणे यांनी आयोजित पत्रकार परिषेदेत केले. याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे आदी उपस्थित होते.

येथील शिवाजी नगर परिसरातील एका नागरिकांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आलेली असतांना देखील त्याने उपचार न घेताच शहरात फिरल्याने त्याच्या कुटुंबातील तिघांसह इतर नऊ असे १२ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या या निष्काळजीपणामुळे शहरात कोरोनाचा प्रसार झाल्याने त्या विरोधात पालिका प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

शिवाजी नगर परिसरातील एक उपनगरातील तरुणाचा अँटीजेन चाचणी आवाहल मंगळवार ८ रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यास ऍडमिट होण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्याने खासगी दवाखान्यात आपण स्वतः ऍडमिट होऊ असे सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यास आम्ही ऍम्ब्युलन्स बोलवतो तुम्हाला त्यातून ऍडमिट होण्यासाठी जावे लागेल असे सांगण्यात आले.

परंतु, त्याने यास नकार देत गोंधळ घातला. कर्मचारी दुसऱ्या व्यक्तीची चाचणी करण्यासाठी गेले आहेत ही संधी साधून तो तेथून निघून गेला. या दरम्यान, त्याने दुसरीकडे अँटीजेन चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मी ऍडमिट होणार नाही असा पवित्रा त्याने घेतला होता. दरम्यान, त्याने कालावधीत त्याच्याच कुटुंबातील ३ व इतर ९ व्यक्तींना देखील कोरोना बाधित झाले असल्याचे तेथील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सांगितले आहे. महापौर भारती सोनवणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अँटीजेन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांनी ऍडमिट व्हावे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/366474314363046/

 

Protected Content