जिल्ह्यात आज ८८९ कोरोना पॉझिटीव्ह; ८२४ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ८८९ कोरोना बाधीत आढळून आले असून आजच ८२४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजचा आकडा धरून जिल्ह्यातील आजवरच्या बाधीतांचा आकडा ३५ हजारांच्या वर गेला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात ८८९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यात चाळीसगाव, धरणगाव, पारोळा, भुसावळ, जामनेर आदी तालुक्यांमध्ये संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. तालुक्यानुसार वर्गवारी केली असता पुढील प्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत.

जळगाव शहर-७५; जळगाव तालुका ३१; भुसावळ-६५; अमळनेर-४७; चोपडा-४८; पाचोरा-५६; भडगाव-३६; धरणगाव-८४; यावल-१९; एरंडोल-४१; जामनेर-८८; रावेर-१४; पारोळा-६६; चाळीसगाव-१३६; मुक्ताईनगर-२३; बोदवड-४६ आणि इतर जिल्ह्यातील १५ असे रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आजच जिल्ह्यातील ८२४ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आजवर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा हा ३५३४२ वर गेला असून कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या २५१२८ इतकी झालेली आहे. कोरोनामुळे आज २० मृत्यू झाले असून आजवरच्या मृतांचा आकडा ९१४ इतका झालेला आहे. तर सध्या ९३०० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Protected Content