शेख हारून शेख इकबाल डायमंड यांना डॉक्टरेट पदवी घोषित

सावदा ता. रावेर, प्रतिनिधी | येथील इंग्लीश मेडियम स्कूलचे चेअरतमन शेख हारून शेख इकबाल डायमंड यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी घोषित करण्यात आले आहे. त्यांना १८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

तालुक्यातील सावदा येथील इंग्लीश मेडियम स्कूलचे चेअरतमन यांना नुकतीच कॉमनवेल्थ वोकेशनल युनिर्वसिटी, किंग्डम ऑफ टोंगा द्वारे दिला जाणारा महाराष्ट्र राज्याच्या सर्वेच्या माध्यमातून हाजी हारून शेख यांना डॉक्टरेट पदवी घोषित करण्यात आले आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान त्यांना १८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे कॉमनवेल्थ वोकेशनल युनिर्वसिटी, किंग्डम ऑफ टोंगा तर्फे प्रदान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या समाजकार्य खरंच वाखाणण्याजोगे आहे. नेहमीच गोरगरीबांच्या अडीअडचणीत धावून जाणे, कोणत्याही जातीधर्मात भेदभाव न करता शासकीय मदत असो वा अशासकीय मदत असो, औषोधोपचाराची मदत, एव्हढेच नव्हे तर परीसरातील जनतेचा त्यांच्या वरती एवढा विश्वास आहे. की, कौटुंबीक वाद देखील सामोपचाराने सोडवण्याची त्यांची प्रयत्नांची परकाष्ठा असते. तसेच
शैक्षणीक क्षेत्रात त्यांनी आधुनीकतेची कास धरत क्रांती घडवित असल्याचे एका सर्वे मध्ये दिसून आलेले आहे. डायमंड इंग्लीश मेडियम स्कूल संपूर्ण पणे हायटेक करण्याकडे सतत वाटचाल करीत असून मुलांना त्यांच्या आवडीनुसार करीयर घडवीण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी स्कूलचे प्राचार्य यांची निवड सुध्दा खूप विचारपुर्वक केलेली आहे. स्कूलचे प्राचार्य खुप विद्वान तर आहेतच पण विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेत असतात हाजी हारून शेख यांचे स्वप्न सावदा शहरात शैक्षणीक हब निर्माण करण्याचे असून स्पोर्ट कॉलेज, इनजीनीयरींग कॉलेज, मेडीकल कॉलेज, इ. सर्व प्रकारचे जेजे शक्य होतील ती सुवीधा सर्वाना देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे.

Protected Content